शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

I Love You Rasna.....


उन्हाळा आला की I Love You Rasna टीव्हीवर सुरू होतेच. कुणीतरी celebrity रसनाच्या प्रेमात हमखास असतेच. सध्या करीना आहे तशीच.

पूर्वी टीव्हीवर I Love You Rasna..... यायच्या आधी म्हणजे ऐशीच्या आधी रसनाची छापील जाहिरात मुलांच्या मासिकात यायची. चांदोबा मासिकातली  जाहिरात पाहून लगेचच माझा रसनाचा हट्ट सुरू झाला आणि लगेचच तो पुरविण्यातही आला.  मग पाहुणे मंडळींना रसना कौतुकाने पाजण्यात येवू लागले.  त्यावेळी फ्रीज नसला तरी माठाच्या पाण्याचा थंडावा उन्हाळा सुसह्य करायचा. 
i love you rasna साठी इमेज परिणाम

उन्हाळा म्हटलं की हल्ली वॉटर पार्क, मल्टीप्लेक्स , मॉल आणि सहलींची रेलचेल असते. मामाच्या गावांचे Urbanization झाल्यापासून, मुलांच्या Destination/Theme toursचं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असतं. एका Theme tourचं नावच मुळी "मामाच गाव" असं आहे. 

मी लहान होतो त्या काळात उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची हौस असायची. गणपतीपुळयाजवळ मालगुंड हे माझ आजोळ. एक टुमदार गाव होत. आंबे, फणस, रातांबे, करवंद, जांभळे आणि त्या कोकणी पाककृती !! सार काही रसनेची.. खादयविश्वाची समृद्धी करणारे.

तरीही मामेभावंडांना यावेळी नवीन रसना पाजून चकित करायचं होत. त्याप्रमाणे गावी गेल्यावर सर्वांना रसना पाजून तृप्त करण्यात आले. पण मोठी भावंडे, छायाताई, सीमाताई आणि पम्यादादा पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी शहरात असल्यानं, त्यांना जाता जाता भेटून रसना सरबत करून देण्याचा बेत ठरला. 

त्याप्रमाणे कोल्हापूरला परतण्याआधी रत्नागिरीत मला वाटतं, शिवाजी नगर भागात हे तिघे खोली घेऊन राहत होते. रणरणत्या उन्हात आम्ही तिथे पोहोचलो. गेल्या गेल्या रसना करायचं मी हट्ट धरला.  पम्यादादा आणि सीमाताई  उत्साहित होते. पण छायाताई, मात्र मला नको तुम्हीच प्या काय ते, अस म्हणून शांत होती. माझ्या आई नेहमी प्रमाणे प्रेमळ धाक दिला. मी आणि पम्यादादा रसना तयार करायच्या उद्योगास लागलो. खोलीवर तेवढं सरबत करण्याचं पातेलंही नव्हतं. मग घरमालकांकडून पातेलं आणलं.


त्याकाळी रसना किटमध्ये एक पावडर आणि एक छोटी बाटली असायची, दोन्ही एक लीटर पाण्यात मिसळून त्यात ७५० ग्रॅम (म्हणजे पाऊण किलो ! )  साखर विरघळावी लागे. ढवळण्याच काम संपल्यावर रसना पिण्यासाठी पेले वाट्या काढल्या. आम्ही सर्वांनी आनंदात रसना संपवले. 

पण छायाताईचा पेला तसाच !  शिवाय तिचे डोळे जे आर्द्र वाटतं होते, ते आता पूर्ण भरून आलेले दिसत होते.
काहीतरी बिनसलय. हे कळत होते. काय बिनसलय हे मला त्या वयात समजत नव्हतं. 
आईने मग छायाताईच्या मागं लागून विचारल्यावर कळलं की खोलीवर तेवढीच साखर होती, ती संपली !! आता घरून पुढचा पॉकेट मनी येईपर्यंत, उरलेला महिना  बिनसाखरेचा !!
आणि हो मोबाइल, एटीएम, पेटीएम, क्रेडिट कार्ड वगैरे नसलेला पोस्टावर , एसटीवर अवलंबून असलेला तो जमाना होता. 

आई छायाताईला म्हणाली, " छाया आम्हाला इतक परक का समजलीस ?"  मग ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली.  खोलीवरील समस्त स्त्री वर्गाचा रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. 

तो संपेपर्यंत पप्पा चालत नाक्यावर गेले आणि एक किलो साखर घेऊन आले. फिल्मचं हॅप्पी एंडिंग झालं. 

आजमितीस, आम्ही सारीच भावंडे सुखवस्तू आहोत.  कुणी बिनसाखरेचे नाही !! पण मिळालेला शिस्तीचा वसा टाकलेला नाही. घटनेतून काही गोष्टी शिकायला मिळाल्या.

नाहीतर लाडात वाढवलेल्या माझ्या सारख्या एकुलत्या एकास  दुनियादारी कशी कळावी ?? 
म्हणूनच I Love You Rasna !!




शुक्रवार, ५ जून, २०१५

Pack of Buds ...एक गुलदस्ता

Image result for bouquet of flowers
१० फेब्रुवारी म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस ! कालचा १५ वा. 
सकाळी सौ नी संध्याकाळी लवकर या अशी गोड सूचना केली होती. धमकीच म्हणा ना !  पण अस्मादिक अडकले कामात आणि घरी परत यायला तासभर उशीर झाला. मग आत्मरक्षणासाठी म्हणून Bourbonचा मोठा बिस्कीट पुडा समोर धरून घरात प्रवेश केला.


वातावरण तप्त आहे हे मुलं शांतपणे अभ्यास करत आहेत हे पाहूनच कळत होत. सौ. गंभीरपणे TV पहात असल्यासारख बसलेल्या. Bourbonचा मोठा बिस्कीट पुडा पाहून थोरला सोमू उठला, धाकट्या विरूला प्रसंगाची जाणीव असल्याने तो म्हणाला, "थांब जरा. बाबांनी आईसाठी आणलीयेत. आई वाटेल बिस्कीट". 
पण परिणाम शुन्य !! 
संवाद नाही. बोलण्याला प्रतिसाद नाही. Bourbon तसाच.

वातावरणात तणाव.
मग वीरूने एक प्रस्ताव ठेवला, " आणखीन काहीतरी आणुया का?"
अचानक सौ.,"काहीही नकोय आता !"
सोमुला हा प्रस्ताव फारच इंटरेस्टिंग वाटला. त्यान पटकन ड्रावरमधले पैसे घेतले आणि पळाला.
सोमू काय आणील याबद्दल मी आणि विरु, अंदाज करू लागलो. उद्देश एकाच सौ नी हसावं. तणाव कायम.
.
.
थोड्या वेळाने सोमू आला. त्यान दोन्ही हात मागे ठेवून त्याने थोडासा suspense तयार केला. 
त्याच position मध्ये तो किचनमध्ये गेला. विरु जोरजोरात काय आणलय म्हणून विचारात होता. मी त्याला रोखून धरल. म्हटलं," Let us enjoy the surprise"
सौ अनुत्सुक आणि निर्विकारपणे TV पाहणे सुरूच.
आम्ही तिघे hall मध्ये आणि किचनमध्ये सोमुची खुडबुड सुरु.
.
.
विरूला धीर धरवेना. तो किचनमध्ये पळाला. आणि शांतपणे परत येवून म्हणाला, "फुस्स्स , pack of buds only!!!" 
मी त्याची चूक काढत म्हणालो ," Don't say pack of buds. It must be a small bouquet of buds." कारण सोमुच्या वर्गातील मुलं असे गुच्छ वगैरे देतात अस मला माहित होत. मला खूपच बऱ वाटल. 
…………
थोडया वेळाने सोमू बाहेर आला. हातात खरोखरच, विरु म्हणाला तसा pack of buds .. Jonhsonचा !!!
आम्हा प्रत्येकाला एकेक bud देवून सोमू म्हणाला ," हा आता करा कान साफ !!"
मग मात्र सौ ना हसू रोखता आल नाही.
मी सौ ला bud देत म्हटलं ,"Happy Marriage Anniversary"
हसत हसत सौ बदल्यात मला एक bud देऊन म्हणाली, "Same to youi!!"
इकडे वीरूने Bourbon बिस्कीट खायला सुरुवात केली ।